स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर (SMART) योजने बाबत प्रबोधन शिबिराचे आयोजन

तुळसूली कर्याद नारूर ग्रामपंचायतीच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर (SMART) योजने बाबत प्रबोधन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात महावितरण ओरोस विभागाचे उपविभागीय अभियंता मा कामथे साहेब यांनी योजनेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

या प्रसंगी SMART सोलर योजनेचे उद्दिष्ट, घरगुती रूफटॉप सोलरचे फायदे, शासनाकडून मिळणारे अनुदान, अर्ज प्रक्रिया तसेच नेट मीटरिंगविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.

या कार्यक्रमात महावितरणचे अधिकृत विक्रेते Dabholkar Solar  या कंपनीकडून सोलर प्रकल्पासंबंधी तांत्रिक माहिती देण्यात आली.

सोलरचे प्रमुख फायदे
वीजबिलात मोठी बचत
पर्यावरणपूरक व प्रदूषणमुक्त ऊर्जा
दीर्घकालीन सुरक्षित गुंतवणूक
गावाला स्वयंपूर्ण बनविण्याकडे एक पाऊल
प्रधानमंत्री आवास घरकुल यांना सोलर बसविण्यासाठी शासनाकडून मिळणारे अनुदान या बाबत माहिती

सदर शिबिरास ग्रामपंचायतीचे माननीय सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या योजनेमुळे वीजबिलात मोठी बचत होऊन प्रत्येक घर ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यास मदत होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. शिबिरास उपस्थित ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top