वेत्ये गावात SMART सोलर योजनेबाबत सविस्तर मार्गदर्शन कार्यक्रम

महावितरण व अधिकृत सोलर व्हेंडर दाभोलकर सोलर यांचा संयुक्त उपक्रम

सावंतवाडी उपविभागातील शाखा कार्यालय सावंतवाडी ग्रामीण–१ कार्यक्षेत्रातील वेत्ये गावात राहणाऱ्या घरगुती वीज ग्राहकांना स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप सोलर (SMART) योजना याबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात योजनेची उद्दिष्टे, लाभ, उपलब्ध अनुदान, अर्ज प्रक्रिया तसेच रूफ टॉप सोलर प्रणाली बसविल्यामुळे होणारी वीज बचत याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. उपस्थित घरगुती वीज ग्राहकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान ग्राहकांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देण्यात आली. त्यामुळे अनेक घरगुती ग्राहकांनी SMART सोलर योजनेबाबत सकारात्मक प्रतिसाद दर्शवित सोलर रूफ टॉप प्रकल्प बसविण्याची इच्छा व्यक्त केली.

यावेळी महावितरण मान्यताप्राप्त (Authorized) सोलर व्हेंडर Dabholkar Solar & Agrotech Industries Pvt. Ltd. यांच्यामार्फत सोलर सिस्टीमची तांत्रिक माहिती, कार्यपद्धती व लाभ समजावून सांगण्यात आले.

हा उपक्रम ग्रामीण भागात हरित ऊर्जा, वीज बचत आणि स्वयंपूर्ण महाराष्ट्र या संकल्पनेला चालना देणारा ठरत असून नागरिकांमध्ये सौरऊर्जेबाबत जनजागृती वाढविण्यास निश्चितच उपयुक्त ठरणार आहे.

या कार्यक्रमात गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक तसेच सर्व पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top